लातूर - गेल्या आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत असताना बुधवारी दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली. लातूर ग्रामीणसह रेणापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने ज्वारी, गहू, हरभरा यासह टरबूज, खरबूज याचे नुकसान झाले आहे.
लातुरात अवकाळी; रब्बीसह फळपिकांचे नुकसान - latur rain news
लातूर ग्रामीणसह रेणापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने ज्वारी, गहू, हरभरा यासह टरबूज, खरबूज याचे नुकसान झाले आहे.
बुधवारी दुपापर्यंत ऊन आणि त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अवघ्या काही काळातच मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली होती. लातूर शहरात रिमझिम पाऊस झाला असला तरी ग्रामीण भागासह रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अवकाळी पावसाने खरीप हंगामाचे नुकसान झाले होते. शिवाय यामुळे रब्बीची पेरणीही लांबणीवर पडली होती. असे असतानाही मोठ्या कष्टाने उभे केलेले पीक आता अंतिम टप्प्यात आडवे झाले आहे.
यंदा हरभरा लागवडीत मोठी वाढ झाली होती. शिवाय टरबूज, खरबूज याचीही लागवड जास्त झाली होती. मात्र, यावर आता दावणी, केवडा यासारख्या किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या अवकाळीने गहू, हरभरा, ज्वारी, खरबूज, टरबूज यासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे.