महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजकीय मतभेदातून सामाजिक कार्यकर्त्यावर चाकूने हल्ला; लातूरमधील घटना

उदगीर तालुक्यातील देवर्जन हनुमंतवाडी येथे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण बतले यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण बतले

By

Published : Sep 28, 2019, 4:59 PM IST

लातूर - विधानसभेची रणधुमाळी सुरू असून, गावस्तरावरील राजकीय मतभेद समोर येत आहेत. यातूनच उदगीर तालुक्यातील देवर्जन हनुमंतवाडी येथे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण बतले यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा चाकूने भोसकून मिरजेत तृतीय पंथीयाचा खून

देवर्जन हणमंतवाडी येथे लक्ष्मण बतले यांच्यावर गावातीलच प्रकाश कुंभार यांनी चाकूने हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी आहेत. राजकीय मतभेदातून माझी सुपारी घेतली असून, यातूनच हा हल्ला झाल्याचे बतले यांनी सांगितले आहे.

हेही वाचा औरंगाबादेत चाकूने भोसकून पतीची हत्या; पुरावे नष्ट करतानाच पोहचले पोलीस

याप्रकरणी उदगीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, यासंबंधी उदगीर पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details