लातुर - अकृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करावा. यासाठी समिती स्थापन करण्याच्या मागणीसाठी अकृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संप पुकारला आहे. शिवाय मागणी पूर्ण न झाल्यास १५ जुलै पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
७ व्या वेतन आयोगाची मागणी; अकृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी पुकारला लाक्षणिक संप - strike
अकृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी लात्क्षणिक संप करण्यात आला. मागणी पूर्ण न झाल्यास १५ जुलै पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

अकृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करावा यासंदर्भात गतवर्षी समिती स्थापन करण्यात आली. शिवाय राज्यशासनाच्या आदेशाचे पालन करून प्रारूप तयार करून सादरही केले आहे. मात्र, ६ अकृषी विद्यापीठातील शिक्षेत्तर पदाच्या पदनामात बदल होऊन वेतनश्रेणीतही बदल झाला आहे. त्यामुळे गतवर्षीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मात्र, सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी ज्या पदांचा समावेश याचिकेत व पदनाम बदल होऊन वेतनश्रेणीमध्ये बदल झाला आहे अशी पदे वगळून इतरांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केली आहे. या शिक्षकांचा प्रश्न त्वरित मार्गी लागावा अन्यथा १५ जुलैपासून बेमुदत संप केला जाणार असल्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.
शनिवारी येथील विद्यापीठ उपकेंद्र येथे शिक्षकांनी लाक्षणिक संप पुकारला होता.