उदगीर ( लातूर ) : 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ( Akhil Bharatiy Marathi Sahitya Sammelan Udagir ) उद्या (दि.22एप्रिल) सकाळी 10.30 वाजता राष्ट्रवादीचे नेता खा. शरद पवार ( NCP Chief MP Sharad Pawar ) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भारत सासणे, मावळते अध्यक्ष डॉ.जयंत नारळीकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो यासमवेत माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकुरकर, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, मंत्री सुभाष देसाई, पंडीत-हदयनाथ मंगेशकर यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.
संमेलांची कशी आहे व्यवस्था : हे संमेलन यशस्वीरित्या पार पाडावे यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. संमेलनाचे आयोजक असलेल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, सैनिक शाळा आणि शहरातील इतर संस्थेतील 310 कर्मचारी मागील चार महिन्यांपासून कष्ट घेत आहेत. तब्बल 1200 स्वयंसेवक येथे दिमतीला आसणार आहेत. कामाची विविध स्तरावर विभागणी करण्यात आली आहेत. येथील महाविद्यालयाच्या 36 एकर जागेत सात भव्य व्यासपीठ तयार करण्यात आले असून, मुख्य व्यासपीठाच्या समोर तब्बल 10- 12 हजार प्रेक्षकांना बसण्याची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. सहा व्यासपीठ जिथे आहेत तिथे प्रत्येकी एक हजार प्रेक्षकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
१०० पेक्षा जास्त जम्बो कुलर :संमेलनाच्या प्रत्येक व्यासपीठाच्या सभामंडपात रसिकांची थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, जवळपास १०० पेक्षा जास्त जम्बो कुलर येथे लावण्यात आले आहेत. प्रत्येक मंडपात १० फुटावर एक पंखा बसविण्यात आला आहे. अनेक सेवाभावी संस्थेकडून लिंबूपाण्याची सोय करण्यात आली आहे. हवाई प्रवास करणाऱ्या अतिथींसाठी शहरात सहा ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आले असून, त्यांच्या भोजन व्यवस्थेवर विशेष यंत्रणा कार्यरत आहे. जवळपास सकाळ- संध्याकाळ मिळून १० हजार सारस्वतांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
एक हजार निमंत्रित :साहित्य संमेलनासाठी ३५० साहित्यिकांसह एक हजार निमंत्रित येणार आहेत. त्यांच्या निवासासाठी उदगीर येथे १४० बिदर ३० तर लातूर येथे ४० खोल्यांची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. उदगीर शहरातील विविध महाविद्यालयातील रुममध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. देशाचे राष्ट्रपती साहित्य संमेलनाला पहिल्यांदाच येत आहेत. उदगीर सारख्या ग्रामीण भागातील तालूक्याच्या ठिकाणी कमी काळात एवढी मोठी यंत्रणा उभी करणे अवघड होते. परंतू सर्व स्तरावरील सहकार्य लाभत असून, हे संमेलन आम्ही यशस्वी करु, असा विश्वास संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला आहे.
हेही वाचा : Marathi Sahitya Sammelan 2022 : ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची 'ही' ग्रंथसंपदा आहेत प्रसिद्ध, वाचा सविस्तर...