महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उमरगा-लातूर मार्गावर दुचाकींचा समोरासमोर अपघात, दोन तरुणांचा मृत्यू - दोघा तरुणांचा अपघाती मृत्यू

क्षमतेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविण्याचा परिणाम काय होतो याचा प्रत्यय लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात आला आहे. बसला ओव्हरटेक करून जाताना समोरून येणाऱ्या दुचाकीला अपघात झाल्याने दोन तरुणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये औसा आणि उमरगा तालुक्यातील तरुणांचा समावेश आहे.

उमरगा-लातूर मार्गावर दुचाकींचा समोरासमोर अपघात
उमरगा-लातूर मार्गावर दुचाकींचा समोरासमोर अपघात

By

Published : Jan 20, 2021, 1:04 PM IST

लातूर - दुचाकीस्वार तरुणांना वेगाची नशा अनेकदा जीवावर बेतते. अशीच एक घटना औसा तालुक्यातील किल्लारी परिसरात घडली आहे. बसला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोन गंभीर जखमी झाेल आहेत. समाधान राम कांबळे (वय 26 रा. कवठा ता. उमरगा. जि. उस्मानाबाद) आणि निलेश मदन पाटील असे दोघा मृतांची नावे आहेत.

दोघांचा जागीच मृत्यू-

लातूर-उमरगा या राज्यमार्गावरून किल्लारी येथून समाधान कांबळे व त्याचा मित्र दुचाकीवरून उमरगाकडे निघाले होते. दरम्यान, किल्लारी पासून जवळच बसला ओव्हरटेक करीत असताना समाधान कांबळे यांच्या दुचाकीचा समोरून येणाऱ्या दुचाकीशी धडक बसल्याने भीषण अपघात झाला. दोन्हीही दुचाकी वेगात असल्याने हे सर्वजण रस्त्याच्या कडले फेकले गेले.

अपघात एवढा भीषण होता की समाधान कांबळे व दुसऱ्या दुचाकीवरील निलेश मदन पाटील यांचा मृत्यू झाला. मार्गावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी या चौघांना किल्लारी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. घोडके यांनी दोघांना मृत घोषित केले. डॉ. एम. के. अनिगुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बिट अंमलदार गौतम भोळे व आबा इंगळे हे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details