महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दोनने वाढ; उदगीरमध्ये 10 जणांवर उपचार - udagir latur

रविवारी दोन रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याने उदगीरमधील रुग्णांची संख्या आता 10 वर पोहचली आहे. सद्यस्थितीला एकही अहवाल प्रलंबित नसल्याचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले आहे. मात्र, उदगीरमधील रुग्णांची संख्या दिवसागनिस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

udagir corona
कोरोनाग्रस्तांच्याudagir corona संख्येत दोनने वाढ; उदगीरमध्ये 10 जणांवर उपचार

By

Published : May 4, 2020, 2:02 PM IST

लातूर- जिल्ह्यात केवळ उदगीर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी नव्याने दोन रुग्णांची भर पडली असून कोरोनाबाधितांची संख्या आता दहावर पोहचली आहे. या सर्व रुग्णांवर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दोनने वाढ; उदगीरमध्ये 10 जणांवर उपचार

आठवड्याभरापासून उदगीर शहरात दिवसागनिस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी लातूर येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात 13 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी आले होते. पैकी 12 नमुने हे एकट्या उदगीर शहरातील होते. यापैकी चौघांचे अहवाल अनिर्णित असल्याने त्यांची 48 तासानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली होती. यामध्ये दोन व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह, एकाचा निगेटिव्ह तर एकजनाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. उर्वरित 8 व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.

त्यामुळे रविवारी दोन रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याने उदगीरमधील रुग्णांची संख्या आता 10 वर पोहचली आहे. सद्यस्थितीला एकही अहवाल प्रलंबित नसल्याचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले आहे. मात्र, उदगीरमधील रुग्णांची संख्या दिवसागनिस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. शिवाय शहरात कोरोनाचा शिरकाव झालाच कसा, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. आतापर्यंत कोरोनामुळे एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, जिल्ह्यात केवळ उदगीर शहरात 10 रुग्ण आहेत.

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दोनने वाढ; उदगीरमध्ये 10 जणांवर उपचार

13 मे पर्यंत शहरात कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवादेखील घरपोच दिल्या जात आहेत. इतर शहरातून तपासणीसाठी नमुनेही कमी असून जिल्ह्यात इतरत्र एकही रुग्ण नाही. मात्र, उदगीमध्येच संख्या वाढत आहे. या सर्व रुग्णांवर सामान्य रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. आठवड्याभरात कोरोनाबाधितांचा दुहेरी आकडा झाला आहे.

जिल्हा प्रशासनाची यंत्रणा या ठिकाणी कार्यरत असतानाही रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details