महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माणुसकीचा लातूर पॅटर्न..! रेणुकाच्या खात्यामध्ये 2 लाखाची मदत राशी जमा - दहावी निकाल 2020

रेणुका गुंडरे हिने इयत्ता दहावीत 93.20 टक्के गुण प्राप्त केले. मात्र, निकालाच्या पूर्वसंध्येलाच तिच्या आईचे सर्पदंशाने निधन झाले होते. तिच्यावर ओढवलेली परस्थिती ईटीव्ही भारताने निकालाच्या दिवशीच समोर आणली होती.

Two lakh rupees help deposit in ac of girl whos mother died before tenth exam result at latur
लातूर रेणुका गुंडरे हिला अनेकांच्या मदतीचा हात

By

Published : Jul 31, 2020, 4:30 AM IST

लातूर - शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्नची संपुर्ण राज्यात एक वेगळी ओळख आहे. मात्र, माणुसकीला साजेल असे कार्य सध्या लातूरकरांनी केले आहे. रेणुका गुंडरे हिने इयत्ता दहावीत 93.20 टक्के गुण प्राप्त केले. मात्र, निकालाच्या पूर्वसंध्येलाच तिच्या आईचे सर्पदंशाने निधन झाले होते. तिच्यावर ओढवलेली परस्थिती ईटीव्ही भारताने निकालाच्या दिवशीच समोर आणली होती. गुरुवारी दिवसभरात रेणुका गुंडरे हिच्या खात्यावर 2 लाख रुपये जमा आले आहेत. शिवाय राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

ईटीव्ही भारतच्या बातमीनंतर रेणुकाच्या खात्यामध्ये 2 लाखाची मदतराशी जमा...

हेही वाचा -रेणुकाच्या यशाला दु:खाची किनार, आनंद साजरा करावा तरी कसा..?

घरात आठरा विश्व दारिद्र्य असताना परिस्थितीशी दोन हात करत जळकोट तालुक्यातील होकर्ना गावच्या रेणुका गुंडरे हिने माध्यमिक शिक्षण घेतले. वडिलांच्या निधनानंतर आईला घरकामात मदत, वेळप्रसंगी रोजनदारीने कामाला जात तिने शिक्षणाचे धडे घेतले होते. अशा कठीण स्थितीतून तिने तब्बल 93.20 टक्के गुण मिळवले होते. मात्र, तिच्या यशाला दुःखाची किनार होती. ती म्हणजे निकालाच्या पूर्वसंध्येला तिच्या आईचे सर्पदंशाने निधन झाले होते. पहिलीत असताना वडिलांचे निधन आता जीवन वेगळ्या टप्प्यावर असताना आईचे निधन. त्यामुळे हुशार, जिद्दी आणि अथक परिश्रम करण्याची तयारी असलेल्या रेणुकाचे भविष्यात काय होणार, तिला मदतीची आवश्यकता आहे. रेणुकाची ही स्थिती ईटीव्ही भारतने मांडली होती.

लातूरमधील रेणुका गुंडरे हिला दहावीत 93.20 टक्के गुण...

ईटीव्ही भारतच्या बातमीनंतर गुरुवारी दिवसभरात रेणुका हिच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील शाखेत 1 लाख 61 हजार जमा झाले आहेत. तर राज्यमंत्री तथा उदगीर मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी 26 हजाराची मदत केली आहे. शिवाय तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले आहे. रेणुकाची परस्थिती पाहून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसेच शासकीय अधिकाऱ्यांनीही मदत केली आहे. भविष्यातही तो कायम रहावा हीच अपेक्षा.

ABOUT THE AUTHOR

...view details