महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाणीटंचाईच्या झळा; गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोन मजुरांचा गुदमरुन मृत्यू - अपडेट न्यूज लातूर

पाणी मिळत नसल्याने या जुन्या विहिरीचे खोदकाम करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने घेतला. त्यानंतर महाळ हिप्परगा येथील मजुरांनी हे गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते. पण विहिरीत पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने मारुती पवार व परमेश्वर केंद्रे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Spot
घटनास्थळ

By

Published : May 24, 2020, 12:08 PM IST

लातूर- पाणीपुरवठा योजनेकडे झालेले दुर्लक्ष आणि ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा दोन मजुरांच्या जीवावर बेतला आहे. पाणीटंचाईच्या झळा भासू लागल्याने 72 वर्ष जुन्या विहिरीतील गाळ काढण्यासाठी उतरलेल्या दोन मजुरांचा ऑक्सिजन अभावी गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्घटना जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथे घडली आहे. मारुती पवार व परमेश्वर केंद्रे अशी गुदमरुन मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत.

महाळ हिप्परगा येथील मजुरांनी गाळ काढण्याचे काम घेतले होते. पण विहिरीत पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने मारुती पवार व परमेश्वर केंद्रे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वांजरवाडा जळकोट तालुक्यातील अडीच हजार लोकवस्ती असलेले गाव. जिल्हा परिषदेचा गट आणि गण असतानाही या गावात पाणीटंचाईच्या झळा कायम होत्या. गावचा पाणीप्रश्न मार्गी लागावा यासाठी 1952 साली गोविंद माऊली मंदिराच्या मागे 72 फूट खोलीची विहीर खोदण्यात आली आहे. मात्र, काळाच्या ओघात गावाला नियमीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी 52 खेडी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. हाळीच्या तळ्यावरुन गावाला पाणीपुरवठा देखील होत होता. मात्र, दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा या ठरलेल्याच. त्यामुळे नियमित पाणी मिळत नसल्याने या जुन्या विहिरीचे खोदकाम करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने घेतला.

पाणीटंचाईच्या झळा; गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोन मजुरांचा गुदमरुन मृत्यू

महाळ हिप्परगा येथील मजुरांनी हे गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते. पण बऱ्याच वर्षांपासून विहिरीतील गाळ काढण्यात आला नव्हता. तर मृत झालेले पशु गावची घाण याच विहिरीत टाकली जात होती. अखेर गाळ काढण्यासाठी मारुती बापूराव पवार (30) व परमेश्वर गणपती केंद्रे (29) हे विहिरीत उतरले होते. मात्र, विहिरीतील घाण आणि अरुंद विहिरीत त्यांना ऑक्सिजन मिळाला नसल्याने ते बेशुद्ध झाले, तर इतर दोन मजुरांना क्रेनने बाहेर काढण्यात आले. मात्र, ऑक्सिजन अभावी मारुती आणि परमेश्वर हे दोघे बेशुद्ध झाले होते. गेल्या दोन दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, शनिवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोन मजुरांवर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details