लातूर - लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील परमेश्वर नागनाथ बिरादार (34) तर उदगीर तालुक्यातील वाढवना खुर्द येथील गोपीनाथ ग्यानोबा मद्देवाड (६८) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
लातूर जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या - निलंगा शेतकरी आत्महत्या बातमी
अवेळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि एका राञीत सारे उध्वस्त झाले. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. जगावे का मरावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामता लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील अल्पभुधारक शेतकरी परमेश्वर नागनाथ बिरादार यांनी विहिरित उड़ी मारून जीव दिला आहे. यावर्षी सोयाबीन चांगले आले होते. सोयाबीन काढले ही होते, मात्र त्याच दिवशी तूफान पाऊस झाला आणि काढलेले सोयाबीन पाण्यात वाहून गेले. यामुळे मानसिकरित्या खचलेले परमेश्वर दोन दिवसांपासून घरातून गायब होते. रात्रि उशिरा त्याचा मृतदेह विहिरित सापडला. औराद शाहजनी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर दूसरी घटना उदगीर तालुक्यातील आहे. वाढवना खुर्द येथील गोपीनाथ ग्यानोबा मद्देवाड यांच्याकडे तीन एकर शेती आहे. यावरच त्याच्या घर चालते. मात्र यावर्षी सततच्या पावसाने त्याचा घात केला. लोकांची देणी कशी द्यावी. या विवंचनेत त्यांनी शेतातील झाडाला गळफांस घेत आपली जीवनयात्रा संपवली. या बाबत वाढवना पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
यावर्षी पिके जोमदार आली होती; मात्र हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आणि होत्याचे नव्हते झाले. अवेळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि एका राञीत सारे उध्वस्त झाले. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. जगावे का मरावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामता लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.