लातूर - निलंगा शहराच्या आनंदमुनी चौकातील भाजी मंडई येथे अशोक ग्यानबा कोरके (वय ३५ रा.मारवाड गल्ली) यांचा तर शहरापासून जवळच असलेल्या दापका गावातील एका कठड्याच्या कडेला शरीराने अपंग असलेले गंगाभीषण अमृतराव भोपी यांचा मृतदेह आढळून आला. शनिवारी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
निलंग्यात एकाच दिवशी दोघांचे मृतदेह मिळाल्याने खळबळ - निलंगा पोलीस ठाणे
शनिवारी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
![निलंग्यात एकाच दिवशी दोघांचे मृतदेह मिळाल्याने खळबळ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5015533-220-5015533-1573323282922.jpg)
लातूर
याबाबत निलंगा पोलिसांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले दिनांक ९ नोव्हेंबरला सकाळी शहरातील आनंदमुनी चौक आणि दापका येथे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पंचनामा करून निलंगा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दोघाही मयत व्यक्तीचे शेवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत बनसोडे करत आहेत. या दोघांचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.