महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुष्काळात तेरावा; वीज पडून दोन बैल दगावले - midnight

अवकाळी पावसामुळे आंबा वगळता इतर पिकांचे नुकसान झाले नाही परंतु उघड्यावरील कडबा चाऱ्याचे नुकसान झाले आहे. भर दुष्काळाचा शेतकरी सामना करत असताना तांबरवाडे यांना दोन्ही बैल गमवावे लागले आहेत.

वीज पडून दोन बैल दगावले

By

Published : May 22, 2019, 7:13 PM IST

लातूर - दिवसभर उन्हाची तीव्रता आणि मध्यरात्री विजेच्या कडकडासह निलंगा तालुक्यातील औरद शहजनी परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याला बैलजोडीही गमवावी लागली.

निलंगा तालुक्यात मंगळवारी मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या दरम्यान माने जवळगा गावात राम तांबरवाडे यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन बैलाचा वीज पडल्याने मृत्यू झाला. अवकाळी पावसामुळे आंबा वगळता इतर पिकांचे नुकसान झाले नाही परंतु उघड्यावरील कडबा चाऱ्याचे नुकसान झाले आहे. भर दुष्काळाचा शेतकरी सामना करत असताना तांबरवाडे यांना दोन्ही बैल गमवावे लागले आहेत. दरम्यान, आज सकाळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव व तलाठी सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मदतीबाबतचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच रणजी संदीप मोरे,पोलिस पाटील कुमार पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details