महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातुरमध्ये प्रशासनाच्या आदेशाला व्यापाऱ्यांचा 'खो', निर्बंध धुडकावत दुकाने सुरुच - Traders in Latur oppose the decision

महाराष्ट्र राज्याच्या सुरक्षिततेसाठीचे स्तर ठरवण्यात आले आहेत. त्या आधारे कोरोना संसर्गाची जिल्ह्यातील साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्राधिकरणाने (दि.26 जून, 2021)रोजी आदेश काढून निर्बंध घातले आहेत. परंतु, लातूरच्या मुख्य बाजारपेठेतील बहुतांश व्यापाऱ्यांनी दुपारी चार वाजल्यानंतरही आपली दुकाने सुरुच ठेवल्याचे चित्र रोज पहायला मिळत आहे.

लातूरच्या मुख्य बाजारपेठेतील बहुतांश व्यापाऱ्यांनी निर्बंध असतानाही दुपारी चार वाजल्यानंतरही आपली दुकाने सुरुच ठेवल्याचे चित्र आहे.
लातूरच्या मुख्य बाजारपेठेतील बहुतांश व्यापाऱ्यांनी निर्बंध असतानाही दुपारी चार वाजल्यानंतरही आपली दुकाने सुरुच ठेवल्याचे चित्र आहे.

By

Published : Jul 14, 2021, 5:29 PM IST

Updated : Jul 14, 2021, 8:07 PM IST

लातुर - राज्य प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्हा प्राधिकरणाने सायंकाळी चार वाजल्यानंतर जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापनावर निर्बंध घातले आहेत. परंतु लातुरमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईतील बहुतांश व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचे निर्बंध धुडकावत सायंकाळी चार वाजल्यानंतरही आपली दुकाने सर्रासपणे सुरु ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

लातुरमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईतील बहुतांश व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचे निर्बंध धुडकावत सायंकाळी चार वाजल्यानंतरही आपली दुकाने सर्रासपणे सुरु ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दुकाने सुरुच ठेवल्याचे चित्र

महाराष्ट्र राज्याच्या सुरक्षिततेसाठीचे स्तर ठरवण्यात आले आहेत. त्या आधारे कोरोना संसर्गाची जिल्ह्यातील साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्राधिकरणाने (दि.26 जून, 2021)रोजी आदेश काढून निर्बंध घातले आहेत. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील जीवनावश्यक किंवा अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने आठवड्याची सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील. तर, अत्यावश्यक गटात नसलेले इतर सर्व दुकाने, आस्थापना सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील व दुपारी चार वाजल्यानंतर बंद राहतील. तसेच, आठवड्यातील शनिवार व रविवार हे दोन दिवस त्या पुर्णत: बंद राहतील. असे जिल्हा प्रशासनाच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे. परंतु, लातूरच्या मुख्य बाजारपेठेतील बहुतांश व्यापाऱ्यांनी दुपारी चार वाजल्यानंतरही आपली दुकाने सुरुच ठेवल्याचे चित्र रोज पहायला मिळत आहे. विशेषत: याकडे प्रशासनानेही पुरर्णतः दुर्लक्ष केल्याने नागरिकांकातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

Last Updated : Jul 14, 2021, 8:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details