लातूर -देशातील व परदेशातील कंपन्या आपला बनवलेला माल ऑनलाइन मार्केटिंगला विकतात. यामुळे स्थानिक व्यापार्यांवर अन्याय होत आहे, असा आरोप करत निलंगा येथील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. यावेळी शहरातील मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर व्यापाऱ्यांनी भारत बंदमध्ये सामील होत, एक दिवसाचा व्यापार बंद ठेवला. तसेच उपविभागीय अधिकारी निलंगा यांना निवेदन दिले.
ऑनलाईन खरेदीच्या विरोधात निलंग्यात व्यापाऱ्यांचा एक दिवसाचा बंद.. हेही वाचा...देशव्यापी संपात बँक कर्मचारी संघटनांचा सहभाग; बँकेच्या सेवा विस्कळीत
देशात सध्या काही भारतीय व परदेशी कंपन्या जास्तीत जास्त माल हा ऑनलाइन कंपनीला विक्री करून स्थानिक व्यापार्यांवर अन्याय करत आहेत. तसेच भारतीय फायनान्स कंपन्या या ऑनलाइन ग्राहकांना सवलती देतात. मात्र, स्थानिक व्यापारी ग्राहकांना वेगवेगळे चार्जेस लावून देत असल्याने सामान्य ग्राहक हा अधिकाधिक ऑनलाइन शॉपिंगकडे वळला जात आहे.
हेही वाचा... मलेशियाकडून पामतेल आयात थांबवा; सरकारची उद्योगांना सूचना
त्यामुळे स्थानिक व्यापारी अडचणीत येताना दिसत आहे. यासाठीच, काही दिवसात व्यापार बंद होत, बेकारीचा भडका उडेल. तसेच भारत सरकारने यात हस्तक्षेप करावा. स्थानिक व्यापाऱ्यांना सुविधा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन निलंगा येथील सर्व व्यापाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी विकास माने यांना दिले. यावेळी राजू कच्ची, खय्युम मासुलदार, दिलीप रंडाळे, श्रीशैल गबुरे, सबदरअली इनामदार, श्याम पांचाळ, संतोष भुरके आदींसह व्यापारी उपस्थित होते.