लातूर- जिल्ह्यात मुख्य शहरासंह ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असली तरी गुरुवारी 2 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. तर एका रुग्णाची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाचे एकूण रुग्ण 120 झाले असून पैकी 60 जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. 57 जणांवर उपचार सुरू असून, तिघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
लातुरात एका नव्या रुग्णाची भर, दोघांना डिस्चार्ज; 57 रुग्णांवर उपचार सुरू - लातूर कोरोना व्हायरस न्यूज
गुरुवारी दोन रुग्णांना डिस्चार्ज मिळाला, तर लातूर शहरातील मोती नगर येथे एक नवा रुग्ण समोर आला आहे. या रुग्णास विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आल्याचे डॉ. मारुती काळे यांनी सांगितले आहे.
पंधरा दिवसापूर्वी लातूर जिल्हा हा ग्रीन झोनच्या उंबरठ्यावर होता. जिल्ह्यात केवळ उदगीर शहरात रुग्ण होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली आणि पुणे- मुंबईहून येणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळेच रुग्णांचा आकडा हा झपाट्याने वाढला आहे. मुख्य शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.
गुरुवारी दोन रुग्णांना डिस्चार्ज मिळाला, तर लातूर शहरातील मोती नगर येथे एक नवा रुग्ण समोर आला आहे. या रुग्णास विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आल्याचे डॉ. मारुती काळे यांनी सांगितले आहे. उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून आलेले आठही नमुने हे निगेटिव्ह आले, तर निलंगा, अहमदपूर, जळकोट या तालुक्यातून आलेले नमुनेही निगेटिव्ह आहेत. त्यामुळे ही समाधानाची बाब असली तरी उदगीर आणि लातूर या मुख्य शहरात वाढती रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब आहे.