लातूर - गेल्या 8 दिवसांपासून वाढत्या उन्हामुळे नागरिकांची लाहीलाही होत होती. अखेर रविवारी सायंकाळी 5 वाजता शहरासह जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्यापासून तर दिलासा मिळाला आहे. शिवाय खरीप पेरणीपूर्वी हा पाऊस पोषक ठरणार आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.
लातुरात बरसल्या पावसाच्या सरी; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा
रविवारी सायंकाळी 5 वाजता शहरासह जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्याचा 2 दिवसांपूर्वी पारा 42 अंशावर गेला होता. त्यामुळे वाढत्या उन्हाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी 5 च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह लातूर शहरात पावसाला सुरूवात झाली होती. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली असली तरी उकाड्यापासून लातूरकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.
आज पावसाला सुरुवात झाली असली तरी भविष्यात या पावसात सातत्य राहावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.