लातूर - गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. बुधवारी जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तब्बल 606 रुग्णांची वाढ झाल्याने लातूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 32799 वर पोहोचली आहे. त्यापैकी एकूण 27 हजार 523 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 752 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी जिल्ह्यात 272 जणांनी कोरोनावर मात केली.
लातूर जिल्ह्यात बुधवारी 606 कोरोनाबाधितांची नोंद - कोरोना रुग्णांमध्ये वाढ लातूर
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. बुधवारी जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तब्बल 606 रुग्णांची वाढ झाल्याने लातूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
कोविड सेंटरच्या संख्येत वाढ
मध्यंतरी दिवसाला केवळ 30 ते 40 रुग्ण आढळून येत होते, त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय येथेच कोविड सेंटर सुरू होते. परंतु, आता रुग्णांची संख्या वाढत असल्याने समाज कल्याण विभागाची इमारत, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर उदगीरच्या ग्रामीण रुग्णालयातही कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. तर अनेक रुग्ण घरातूनच उपचार घेत आहेत. दरम्यान कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता आणखी कोविड सेंटरची गजर भासू शकते.