लातूर-एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी पुन्हा लातूर जिल्ह्यात 3 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 41 वर गेली आहे. यामध्ये लातूर शहरातील 1 तर 2 रुग्ण हे हिप्परगा येथील रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत.
लातुरात आढळळे 3 नवे कोरोनाबाधित रुग्ण; 41 जणांवर उपचार सुरू - Latur Coronavirus updates
लातूर शहरातील भाग्य नगरमधील 1 एकास कोरोना झाल्याचे समोर आले आहे. हा रुग्ण 4 जून रोजी सांगलीहून प्रवास करुन शहरात दाखल झाला होता.
जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. आतापर्यंत 100 रुग्ण हे उपचार घेऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी लातूर शहरातील भाग्य नगरमधील 1 जणास कोरोना झाल्याचे समोर आले आहे. हा रुग्ण 4 जून रोजी सांगलीहून प्रवास करून शहरात दाखल झाला होता. तपासणीसाठी वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात दाखल झाला असता त्यांना कोरोना झाल्याचे निदर्शनास आले होते. तर इतर 2 रुग्ण औसा तालुक्यातील हिप्परगा येथील रुग्णाच्या संपर्कात आलेले होते. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 41 तर उपचार घेऊन ठणठणीत झालेले रुग्ण हे 100 आहेत तर आतापर्यंत 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
एका बाजूला लातूर शहरात रूग्ण सापडत असताना शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये असलेली लेबर कॉलनी खुली करण्यात आली आहे. ही दिलासादायक बाब असली तरी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.