लातूर- स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा यंदाचा युवक महोत्सव लातूर शहरालगतच्या बाभळगावतील व्यंकटराव देशमुख या महाविद्यालयात पार पडणार आहे. 21 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. यामध्ये लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असल्याचे विद्यापीठाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यंदाचा 'विलास युवक महोत्सव' बाभळगावत; 4 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सहभाग - लातूर बातमी
युवकांच्या कलागुणांना वाव देण्याच्या अनुषंगाने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा प्रथमच बाभळगाव येथे हा महोत्सव पार पडत आहे. यावेळी 7 मंचावरुन विद्यार्थ्यांच्या 28 कला गुणांचे दर्शन होणार आहे.
हेही वाचा-लातूरमध्ये शेती व्यवसाय धोक्यात; जगावे की मरावे शेतकऱ्यांसमोर प्रश्न
युवकांच्या कलागुणांना वाव देण्याच्या अनुषंगाने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा प्रथमच बाभळगाव येथे हा महोत्सव पार पडत आहे. यावेळी 7 मंचावरुन विद्यार्थ्यांच्या 28 कला गुणांचे दर्शन होणार आहे. तब्बल 2 हजार विद्यार्थ्यांची 4 दिवस राहण्याची सोय महाविद्यालयाकडून करण्यात आली असून याकरिता विद्यापीठाकडून 8 लाखाचा निधी दिला जाणार असल्याचे डॉ. मुंढे यांनी सांगितले. विलास युवक महोत्सवाचे उद्घाटन सिने अभिनेत्याच्या उपस्थित होणार आहे. तर समारोपास गायक रोहित राऊत, मंगेश बोरगावकर, हास्य कलाकार बालाजी सूळ यांची उपस्थिती राहणार आहेत. कुलगुरू उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी 13 सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार आहेत. व्यंकटराव देशमुख महाविद्यालयाच्या मैदानात महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. महोत्सवाचा प्रारंभ शोभयात्रेने होणार असल्याचेही डॉ. मुंढे यांनी सांगितले.