लातूर - महाप्रसादातून 13 जणांना विषबाधा झाल्याची घटना चाकूरमधील शंकरवाडी येथे घडली आहे. श्रावणी सोमवारनिमित्त प्रसादाचे वाटप करण्यात आले होते. यामधून गावातील 13 जणांना विषबाधा झाली असून तिघांवर चापोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महाप्रसादातून 13 जणांना विषबाधा; चाकूरमधील घटना - श्रीनिवास हानसाळे
श्रावणी सोमवारनिमित्त प्रसादाचे वाटप करण्यात आले होते. यामधून गावातील 13 जणांना विषबाधा झाली असून तिघांवर चापोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चाकूरमधील शंकरवाडी येथे बुधवारी श्रावणी सोमवारनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नरशिव बडगिरे यांच्या घरी या महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी गावातील 100 ते 150 ग्रामस्थांनी बडगिरे यांच्या घरी प्रसाद घेतला. मात्र, शिल्लक राहिलेले अन्न दुसऱ्या दिवशी गावात वाटप करण्यात आले होते. शिळे अन्न वाटप केल्यानेच गावातील 13 ते 15 जणांना जुलाब, उलटी याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे या रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी चापोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. यामध्ये पमाबाई शंकरे, अनिता तातपुरे, सुमनबाई कोल्हे, सुशिला कोल्हे, भारतबाई गंगापुरे, सरोजा गंगापूरे, अनुसया बडगिरे, सविता चेपुरे, अभिषेक ततापुरे, काशीबाई कसले यांचा समावेश आहे. सर्व रुग्णाची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास हानसाळे यांनी सांगितले आहे.