लातूर -निलंगा तालुक्यातील आंबेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी शेतात गोठ्यात बांधलेली १ लाख रुपये किमतीची बैलजोडी चोरल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलंगा तालुक्यातील आंबेगाव येथील शेतकरी प्रमोद मरूरे यांची मसलगा डॅमच्या शेजारी शेती आहे. त्यांनी शेतातील गोठ्यात १ लाख रुपये किमतीची बैलजोडी व इतर जनावरे बांधून ठेवली होती. 'रात्री ते जेवण करण्यासाठी घरी गेले असता ९.३० च्या दरम्यान अज्ञात चोरांनी विना नंबरचा टेम्पो शेतात आणून गोठ्यात बांधलेली बैलजोडी त्यात घालून पोबारा केला. या टेम्पोमागे जय महाराष्ट्र लिहिले होते,' अशी फिर्याद निलंगा पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.