लातूर - काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या लातूरमध्ये आज लोकसभा प्रचाराचा नारळ फुटणार आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे यानिमित्ताने लोकार्पण करण्यात आले.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, रितेशने केलं शूटिंग - विलासराव देशमुख
माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री शिवराज पाटील निलंगेकर, आमदार अमित देशमुख आणि सिनेअभिनेता रितेश देशमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री शिवराज पाटील निलंगेकर, आमदार अमित देशमुख आणि सिनेअभिनेता रितेश देशमुख यांची उपस्थिती होती.
मांजरा कारखाणा परिसरात लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जून खर्गे कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याने त्यांचा शुभसंदेश अमित देशमुख यांनी वाचून दाखवला. सिनेअभिनेता रितेश देशमुख हे वडिलांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तसेच उपस्थितांचे आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग केले.