लातूर-जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करणे निकडीचे झाले आहे. त्यासाठी शहरातील बार्शी रोडवरील शासकीय वसाहतीतील ऑफिसर क्लब या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर स्थापन करण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी आदेश जारी केले आहेत.
लातूरचे ऑफिसर क्लब होणार कोविड केअर सेंटर
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी,जिल्हा आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन ऑफिसर क्लब या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर स्थापन करण्याचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.
ऑफिसर क्लब या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर स्थापन
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी,जिल्हा आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन ऑफिसर क्लब या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर स्थापन करण्याचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक / जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद लातूर यांनी सदरील इमारत ताब्यात घेऊन तेथे कोविड केअर सेंटर स्थापन करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.