महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धामणगावकरांची अशीही देशभक्ती, ग्रामपंचायतीची सूचना.. अन् अख्ख गाव स्तब्ध

सरपंच धनराज पाटील यांच्या संकल्पनेतून प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून 3 वर्षांपूर्वी सुरू केलेला उपक्रम आजही सुरू आहे.

Dhamangaon
धामणगावकरांची अशी ही देशभक्ती

By

Published : Jan 25, 2020, 8:42 PM IST

Updated : Jan 25, 2020, 9:18 PM IST

लातूर- शिरुर अनंतपाळ तालुक्यातील धामणगावला आतापर्यंत आदर्श गाव म्हणून एक, दोन नव्हे तर वेगवेगळ्या स्थराचे 12 पुरस्कार मिळाले आहेत. परंतु, प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा, असा उपक्रम गेल्या 3 वर्षांपासून या गावाने राबवला आहे.

धामणगावकरांची अशी ही देशभक्ती

सरपंच धनराज पाटील यांच्या संकल्पनेतून प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून 3 वर्षांपूर्वी सुरू केलेला उपक्रम आजही सुरू आहे. रोज सकाळी ठीक साडेआठ वाजता ग्रामपंचायत कार्यालयातून सूचना दिली जाते आणि राष्ट्रगीतासाठी सबंध गावकरी आहे त्या ठिकाणी स्तब्ध राहून या राष्ट्रगीताचा आदर करतात.

केवळ विकासकामातूनच नव्हे तर सामाजिक उपक्रम आणि गावचा एकोपा याने धामणगावने एक वेगळेपण जपले आहे. आमची ताकद, आमची एकता हे ब्रीद वाक्य घेऊन सरपंच धनराज पाटील यांनी गावगाडा हाती घेतला आहे. गेल्या 50 वर्षांपासून या गावात निवडणूक ही झालीच नाही. गावच्या चौकातील हनुमान मंदिरात सरपंचाची एकमताने निवड केली जाते.

गावाची एकी हेच विकासाचे गमक असून गेल्या 10 वर्षात गावचे चित्र पालटले आहे. रस्ते, वीज, भुयारी गटारी यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून एक नवा आदर्श या गावाने निर्माण केला आहे. ग्रामस्थांमध्ये देशभक्ती निर्माण व्हावी, म्हणून हा सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्याचा उपक्रम गावाने हाती घेतला असून तो यशस्वी करून दाखवला आहे. अडीच हजार लोकसंख्या असलेल्या गावात सुसज्ज रस्ते, इमारती, लोकसंख्येच्या तिप्पट वृक्षलागवड यासारख्या उपक्रमामुळे गावाचा विकास तर होतच आहे, शिवाय दळणवळणाच्या माध्यमातून युवकांच्या हाताला कामही मिळत आहे.

केवळ विकास कामेच नाहीतर प्रत्येक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम या गावाने राबवले आहेत. आज या अनोख्या उपक्रमाला 3 वर्षे पूर्ण झाली असून प्रजाकसत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रम गावात होणार आहेत.

Last Updated : Jan 25, 2020, 9:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details