लातूर- राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रवेशासाठी अत्यावश्यक असलेली प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात जेईईच्या परीक्षेचा आज शेवटचा दिवस होता. शिक्षणाचा लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूर शहरातील २ परीक्षा केंद्रावर आज आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग या २ विषयाची परीक्षा पार पडली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स, सॅनिटायझेशन इत्यादी क्रिया पार पाडल्यानंतरच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्स राखून त्यांची तपासणी करण्यात आली. हात सॅनिटाईज करून त्यांना नवीन सर्जिकल मास्क दिल्यानंतरच परीक्षा केंद्रात सोडले जात होते. परीक्षा केंद्रातही ठराविक अंतरावर कॉम्प्युटर ठेवूनच ऑनलाइन परीक्षेची व्यवस्था करण्यात आली होती.