लातूर -जिल्ह्यातील देवणी, शिरूर अनंतपाळ तालुक्यात गुरुवारी झालेल्या पावसाने वित्त आणि मनुष्यहानी झाली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दक्षिण शेंद येथे दोघांचा वीज कोसळून मृत्यू झाला तर देवणी तालुक्यातील विजयनगर येथील तरुण दुचाकीसह वाहून गेला. वाहून गेलल्या तरुणाचा आज मृतदेह सापडला.
देवणी पुलावरून वाहून गेलेल्या तरुणाचा सापडला मृतदेह - देवणी तरूण मृत्यू
गुरुवारी जिल्ह्यातील देवणी, शिरूर अनंतपाळ तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे देवणी-लासोना मार्गावर खचलेल्या पुलावरून बालाजी पंढरीनाथ शिवपुरे हा तीस वर्षीय तरुण दुचाकीसह वाहून गेला. रात्रीच त्याची शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते मात्र, त्याचा शोध लागला नाही. आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला.
![देवणी पुलावरून वाहून गेलेल्या तरुणाचा सापडला मृतदेह Devani bridge](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7780431-546-7780431-1593167560241.jpg)
गुरुवारी जिल्ह्यातील देवणी, शिरूर अनंतपाळ तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे देवणी-लासोना मार्गावर खचलेल्या पुलावरून बालाजी पंढरीनाथ शिवपुरे हा तीस वर्षीय तरुण दुचाकीसह वाहून गेला. रात्रीच त्याची शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते मात्र, त्याचा शोध लागला नाही. आज सकाळी पुलालगतच्या कठड्याला त्याची गाडी अडकलेली सापडली. ग्रामस्थांनी कसून शोध घेतला असता पुलापासून दीड किमी अंतरावर त्याच्या मृतदेह सापडला. बालाजी शिवपुरे याचा मृतदेह देवणी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
या खचलेल्या पुलावर सातत्याने अपघात होतात. यासंदर्भात तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप देवणी खुर्द येथील ग्रामस्थांनी केला आहे. देवणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.