लातूर- सध्याच्या लॉकडाऊनमुळे पुणे येथील महानुभवपंथ हे निलंगा तालुक्यातील राठोडा येथे अडकले आहेत. त्यांच्याकरिता राहण्यासाठी तंबू आणि जेवणाची सोय जिल्हा प्रशासनाने केली होती. मात्र, सोमवारी रात्री पावसाने हजेरी लावली आणि यामध्ये हे तंबू पूर्णपणे उद्धवस्त झाले. ग्रामस्थांच्या मदतीने या सर्व महानुभपंथाना गावातील शाळा मंदिरात दाखल करण्यात आले आहे.
दुष्काळात तेरावा.. महानुभावांसाठी उभारलेले तंबू पावसाने उद्धवस्त - Corona effect
27 फेब्रुवारी रोजी 1 महिन्याच्या सत्संग सोहळ्यासाठी हजारो साधू-संत निलंगा तालुक्यातील जाधववाडी येथे दाखल झाले होते. 29 मार्च रोजी या कार्यक्रमाचा समारोपही झाला. मात्र, तोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे या 1 हजार 300 नागरिकांची व्यवस्था राठोडा शिवारात करण्यात आली होती. मात्र, सोमवारी रात्री पावसाने हजेरी लावली आणि यामध्ये हे तंबू पूर्णपणे उद्धवस्त झाले.
27 फेब्रुवारी रोजी 1 महिन्याच्या सत्संग सोहळ्यासाठी हजारो साधू-संत निलंगा तालुक्यातील जाधववाडी येथे दाखल झाले होते. 29 मार्च रोजी या कार्यक्रमाचा समारोपही झाला. मात्र, तोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे या 1 हजार 300 नागरिकांची व्यवस्था राठोडा शिवारात करण्यात आली होती. याच ठिकाणी तंबू ठोकून राहण्याची सोय आणि दोन वेळच्या जेवणासाठीचे धान्य देण्यात आले होते.
कोरोनाच्या धास्तीने ही परिस्थिती ओढवली असताना सोमवारी झालेल्या पावसामुळे या ठिकाणचे तंबू तर उद्धवस्त झाले आहेत. शिवाय धान्याची नासाडी झाली असून पावसामुळे नागरिकांसह लहान मुलांचे हाल झाले. अखेर गावकऱ्यांच्या मदतीने या सर्वांची राठोडा गावातील शाळा आणि मंदिरात राहण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्सचे नियम पाळले जातील का, हा सवाल कायम आहे. एकीकडे कोरोनामुळे नागरिक संकटात आहेत. तर, दुसरीकडे या अवकाळी पावसाने तारांबळ उडवली आहे.