लातूर - येथे एका कार्यक्रमादरम्यान, एका समाजातील तरुणाने दुसऱ्या समाजाबद्दल वादग्रस्त विधाने केल्याने शुक्रवारी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वादग्रस्त विधानांचा निषेध करीत दुसऱ्या समाजाच्यावतीने शनिवारी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संबंधित तरुणावर आचारसंहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वादग्रस्त वक्तव्यांवरून २ समाजात वाद; शनिवारी लातूर जिल्हाबंदचे आवाहन - tention in latur
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान एका समाजातील तरुणाने दुसऱ्या समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली होती. यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठली.
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान एका समाजातील तरुणाने दुसऱ्या समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली होती. यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठली. तर, शुक्रवारी शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. शिवाय शहरातून निषेध मोर्चाही काढण्यात आला होता. मोर्चादरम्यान एक तरुण चित्रफीत काढत असल्याचे मोर्चेकऱ्यांच्या निदर्शनास आले होते. यावरून त्या तरुणाचा समर्थक असल्याच्या संशयावरून काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सध्या पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या घटनेचे पडसाद आता जिल्हाभर पसरत असून उद्या जिल्हा बंदचे आवाहन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यासंदर्भात आज लातूर येथे बैठकही पार पडली आहे.