लातूर - शेत जमिनीचा फेर ओढून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तलाठ्याने खडक उमरगा येथील शेतकऱ्याकडे लाचेची मागणी केल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
लाचेची मागणी करणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात - लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्याला रंगेहाथ पकडलं
खडक उमरगा येथील शेतकऱ्याला वडिलोपार्जित शेतजमीन वाटणीप्रमाणे पत्नी व भावजयीच्या नावी करायची होती. याकरता खडक उमरगा सज्जाचे तलाठी बालाजी केशवराव भोसले यांनी तब्बल १५ हजाराची लाच मागितली होती.
खडक उमरगा येथील शेतकऱ्याला वडिलोपार्जित शेतजमीन वाटणीप्रमाणे पत्नी व भावजयीच्या नावी करायची होती. याकरता त्यांनी तलाठी यांच्याकडे अर्जही केले होते. मात्र, खडक उमरगा सज्जाचे तलाठी बालाजी केशवराव भोसले यांनी तब्बल १५ हजाराची लाच मागितली होती. बुधवारी यासंबंधी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर सायंकाळी तलाठी कार्यालय परिसरातच ही लाचेची रक्कम स्वीकारताना भोसले यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
पोलीस उपअधीक्षक माणिक बेंद्रे, पो. नि. कुमार दराडे हे यासंबंधी अधिक तपास करीत आहेत. एकीकडे शेतकरी नैसर्गिक समस्यांना सामोरे जात आहे, तर दुसरीकडे अशा प्रकारे त्यांना सुलतानी संकटाचाही सामना करावा लागत आहे. दरम्यान, याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.