लातूर- खरेदी केलेल्या जमिनीचे फेर ओढण्यासाठी अडीच हजाराची लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला. सचिन भगवान बोटुळे, असे या तलाठ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथे तो कार्यरत होता.
लातूरमध्ये अडीच हजाराची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात
सचिन भगवान बोटुळे, असे या तलाठ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथील फिर्यादीच्या आईच्या नावाने खरेदी केलेल्या गट नंबर 159 मधील जमिनीचे फेर करण्यासाठी बक्षीस म्हणून दोन हजार पाचशे रुपयांची लाच मागितली होती. शहरातील शिवाजी चौक येथे 2 हजार 500 रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडले.
लाचेच्या रक्कमेसह तलाठी सचिन भगवान बोटुळे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक माणिक बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक वर्षा दंडीमे पुढील तपास करत आहेत.