महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उपविजेता असला तरी शैलेशचा आम्हाला अभिमान; टाका ग्रामस्थांच्या भावना

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारत लातूरच्या शैलेश शेळकेचा पराभव केला. यावर, शैलेशच्या टाका गावातील लोकांनी आम्हाला त्याचा अभिमान असून तो उपविजेता ठरला असला तरी पुढच्या वर्षी तो नक्की महाराष्ट्र केसरी बनेल, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

शैलेश शेळकेला महाराष्ट्र केसरीचे उपविजेतेपद मिळाल्यानंतर टाका ग्रामस्थांनी व्यक्त केल्या भावना
शैलेश शेळकेला महाराष्ट्र केसरीचे उपविजेतेपद मिळाल्यानंतर टाका ग्रामस्थांनी व्यक्त केल्या भावना

By

Published : Jan 8, 2020, 8:39 AM IST

लातूर - महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीमध्ये लातूरच्या शैलेश शेळकेचा पराभव झाला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये थोड्याबहुत प्रमाणात नाराजी असली तरी, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली याचा अभिमान आहे. यावर्षी नाहीतर तर आगामी वर्षात तो नक्की महाराष्ट्र केसरीची गदा टाका गावात आणेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

शैलेश शेळकेला महाराष्ट्र केसरीचे उपविजेतेपद मिळाल्यानंतर टाका ग्रामस्थांनी व्यक्त केल्या भावना

महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात गावचा सूपुत्र कुस्तीचे डाव खेळत असल्याने टाका गावात उत्साहपूर्ण वातावरण होते. सर्व ग्रामस्थांनी कुलदैवत भीमाशंकरला अभिषेक करून विजयासाठी साकडे घातले होते. शिवाय सामना पाहण्यासाठी सर्व ग्रामस्थ शाळेमध्ये एकवटले होते. सामना सुरू होताच काही क्षणात शैलेशने एक गुण मिळवताच ग्रामस्थांनी जल्लोष केला. पुढच्या काही क्षणात मात्र, त्याचा पराभव झाल्याचे जाहीर होताच ग्रामस्थांमध्ये कमालीची शांतता पसरली.

हेही वाचा - महाराष्ट्र केसरी : शैलेशच्या विजयासाठी ग्रामस्थांनी घातलं भीमाशंकरला साकडं

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. त्याने शैलेशचा ३-२ ने पराभव करत मानाची गदा पटकावली तर, शैलेश हा उपविजेता ठरला. यावर प्रतिक्रिया देताना ग्रामस्थांनी शैलेशमुळे गावाचे नाव राज्यभर झाले असून त्याचा अभिमान असल्याच्या भावना व्यक्त केल्या. तसेच कुस्ती हा एक खेळ असून यंदा नाही तर पुढच्या वर्षी का होईना शैलेश महाराष्ट्र केसरीची गदा आणेल, असा विश्वासही यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.

हेही वाचा - विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांनी केले रास्ता रोको

ABOUT THE AUTHOR

...view details