लातूर - आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलावरून एका मनोरुग्णाने उडी मारल्याची घटना घडली आहे. यात त्याच्या उजव्या पायाचे हाड मोडले असून तो गंभीर जखमी झाला आहे.
मनोरुग्णाने मारली उड्डाणपुलावरुन उडी प्रकाश दयानंद गायकवाड (वय 35 वर्ष) असे त्याचे नाव असून तो औरंगाबादच्या भीमनगर भाऊसिंगपुरा येथे राहतो. औरंगाबादमध्ये तो आपल्या चुलत्यासोबत लॉटरीच्या दुकानावर काम करतो. दोन दिवसापूर्वी तो लातूरात आला. लातुरातील कपील नगर भागात त्याचे काही नातेवाईक राहतात.
लातूरात आत्महत्यांचे सत्र प्रकाश गायकवाड यास पत्नी पल्लवी, दोन मुली, एक भाऊ, एक बहिण, आई-वडील असा परिवार आहे. मागील काही वर्षापूर्वी त्याचे मानसिक संतुलन बिघडले. औरंगाबदच्या घाटी रुग्णालयात त्याच्यावर उपचारही केले आहेत. त्यात त्याने पत्नीलाही विळ्याने मारहाण केली असल्याची माहिती त्याचा चुलत भाऊ रत्नदीप गायकवाड याने 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.सध्या त्याच्यावर लातूरच्या स्व.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अशोक चौगुले करीत आहेत.
लातूरात आत्महत्यांचे सत्र सुरुच
मागील एक महिन्यात लातूरात आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आनंद नगर भागात राहणाऱ्या सोनी शेख या तरुणीने 'इंस्टाग्राम'वर व्हिडीओ टाकला होता. शहरातील क्रांती नगरातील घृष्णेश्वर नावाच्या तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शहरातील बार्शी रोडवरील होन्डा शो-रुममध्ये कार्यरत सुशांत कांबळे यानेही आत्महत्या केल्याचे सांगितले. आज प्रकाश गायकवाड या मनोरुग्णाने उड्डानपुलावरुन उडी मारुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सध्या लातूरात आत्महत्यांचे सत्र सुरुच असल्याचे चित्र दिसून येत आहे.