लातूर :मुळची औरंगाबाद येथील रहिवासी असलेली साक्षी गायकवाड (वय 19 वर्षे) लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती. उद्यापासून (18 जानेवारी,2023) तिची एमबीबीएसच्या प्रथम वर्षाची परीक्षा सुरू होत आहे. परंतु, आजच तीने आपले जीवन संपवले आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील मुलींच्या वस्तीगृहात तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
आत्महत्येचा निर्णय का घेतला ? डॉक्टर साक्षी ही अभ्यासात हुशार होती. तिच्या संदर्भात जवळच्या मैत्रिणीनी कोणतेही संभ्रमात्मक बाब अद्यापही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली नाही. याप्रकरणी शहरातील गांधी चौक पोलीसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल्य कोल्हे पुढील तपास करित आहेत. आत्महत्येचा निर्णय घेतला त्या अगोदर साक्षीचे कुणाशी काही बोलणे झाले होते का याचीही चौकशी केली जात आहे.