महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने नैराश्य; लातुरात 23 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

पुण्यात शिक्षण घेतलेला सहदेव महांडुळे हा 23 वर्षीय तरुण विद्यार्थी.. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. मात्र, नोकरीसाठी आणि स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने त्याने आत्महत्या केली.

Suicide committed by student due to not getting caste validity certificate
लातुरात विद्यार्थ्याची आत्महत्या

By

Published : Jan 9, 2020, 5:40 PM IST

Updated : Jan 9, 2020, 6:22 PM IST

लातूर -पुणे येथे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात नोकरीसाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक असलेले जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना लातूर येथे घडली आहे. सहदेव लक्ष्मण महांडुळे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पाखरंसांगवी येथे राहणाऱ्या सहदेवने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून लातुरात विद्यार्थ्याची आत्महत्या...

हेही वाचा... पोस्ट मास्तरची हत्या करून शेतात पुरला मृतदेह; रामटेक तालुक्यात खळबळ

सहदेव महांडुळे याने पुणे येथील पिंपरी चिंचवड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही वडील लक्ष्मण महांडुळे यांनी २६ गुंठे जमीन विकली आणि गावातील अनेकांकडून हातउसने पैसे घेत, त्याचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, शासकीय नोकरीकरीता आणि स्पर्धा परीक्षेचे अर्ज करण्यासाठीही सहदेवला जात पडताळणीचे प्रमाणपत्र आवश्यक होते.

हेही वाचा... डीआयजी मोरे प्रकरणाला नवे वळण; पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांचा ड्रायव्हर सांगून धमक्या

त्याने २०१३ मध्ये अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी औरंगाबाद येथे अर्ज दाखल केला होतो. हे प्रमाणपत्र जुलै २०१९ ला समितीने अवैध ठरिवले. त्यामुळे सहदेव यास चार वर्षाची फी द्यावी लागली. शिवाय अभियांत्रिकीचे पदवी प्रमाणपत्र मिळालेले नाही. या नैराश्यातूनच त्याने राहत्या घरात गळफास घेतला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येपूर्वी त्याने दोन ओळीची चिठ्ठी लिहून ठेवली. यात त्याने या घटनेस कोणालाही जबाबदार धरू नये, असा उल्लेख केला आहे.

Last Updated : Jan 9, 2020, 6:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details