महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपचे सुधाकर शृंगारे २ लाख ८९ हजार १११ मतांनी विजयी - latur

गारे यांना २ लाख ८९ हजार १११ एवढे मताधिक्य मिळाले असून २०१४ मधील निवडणुकीचे डॉ. सुनील गायकवाड यांचे रेकॉर्ड त्यांनी मोडीत काढले. काँग्रेसचे मच्छिन्द्र कामंत यांना ३ लाख ७२ हजार ३८४ तर वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर यांना १ लाख १२ हजार २५५ मते मिळाली आहेत.

सुधाकर शृंगारे २ लाख ८९ हजार १११ मतांनी विजयी

By

Published : May 24, 2019, 7:44 AM IST

लातूर- लातूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शुक्रवारची पहाट उजाडली आहे. मतमोजणीच्या सुरवातीपासून आघाडीवर असलेले सुधाकर शृंगारे अखेर विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. शृंगारे यांना २ लाख ८९ हजार १११ एवढे मताधिक्य मिळाले असून २०१४ मधील निवडणुकीचे डॉ. सुनील गायकवाड यांचे रेकॉर्ड त्यांनी मोडीत काढले.

काँग्रेसचे मच्छिन्द्र कामंत यांना ३ लाख ७२ हजार ३८४ तर वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर यांना १ लाख १२ हजार २५५ मते मिळाली आहेत. इतर ७ उमेदवारांना पाच आकडीही अंक गाठता आला नाही. २७ फेऱ्यांमध्येही भाजपचे सुधाकर शृंगारे हेच आघाडीवर राहिले होते. एकूण ११ लाख ७८ हजार ८९ मतांपैकी १५४७ अवैद्य तर ६५६४ मते ही नोटाला पडली. त्यामुळे ११ लाख ६९ हजार २७८ मते ग्राह्य धरण्यात आली होती.

सुधाकर शृंगारे २ लाख ८९ हजार १११ मतांनी विजयी

लातुर शहराची मतमोजणी सुरू असताना मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारी पहाटे विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्यासह निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. यावेळी सुधाकर शृंगारे यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details