लातूर- प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या बदलीसह इतर मागण्यांसाठी ६ दिवसांपासून पुकारलेले आंदोलन कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अखेर मागे घेतले. विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना पाहता ठोंबरे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यांचा कारभार डॉ. हेमंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर डॉ. बाबासाहेब ठोंबरे सक्तीच्या रजेवर हेही वाचा - बिहारमध्ये कन्हैय्या कुमारच्या ताफ्यावर हल्ला
महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच हे विद्यार्थी ठिय्या आंदोलन करत होते. महाविद्यालय परिसरातील घाणीचे साम्राज्य, सुरक्षितता आणि प्रात्यक्षिकाच्या नावाखाली करून घेतले जाणारे अतिरिक्त काम याशिवाय प्रा. ठोंबरे यांची तात्काळ बदली करण्याची त्यांची मुख्य मागणी होती. याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण आणि कुलसचिव रणजित पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरही विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम होते.
हेही वाचा - दिल्लीतील शाहीन बागमध्ये गोळीबार, 'तो' म्हणाला... 'देशात फक्त हिंदूचेच चालणार'
ठोंबरेंना सक्तीच्या रजेवर पाठवताच ६ झाडांची लागवड करून विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. भविष्यात प्रा. ठोंबरेंना परत रुजू करून घेण्यात आले, तर पुन्हा आंदोलन करू, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.