लातूर - शहरातील ज्योतीनगर परिसरात शुक्रवारी एक तरुणी 15 टक्के भाजली होती. या तरुणीला जाळण्यात आले की, ती जखमी झाली यावरून शंका उपस्थित केली जात होती. अखेर २४ तासानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. तरुणीच्या आणि कुटुंबीयांच्या जबाबावरून आणि प्राथमिक तपासानंतर, ही तरुणी स्टोव्हवर दूध तापवत असताना स्टोव्हचा भडका उडाल्यामुळे जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले आहे.
लातूर पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांची प्रतिक्रिया... हेही वाचा... लातुरात १८ वर्षीय तरुणीला रॉकेल टाकून पेटविले?
लातूर शहरातील ज्योतीनगर येथील एका तरूणीचा चेहरा भजल्याने अनेक तर्क-वितर्क मांडले जात होते. नेमके या घटनेमागचे सत्य काय ? असा सवाल उपस्थित झाला होता. यानंतर पोलिसांनी मुलीची आई आणि नातेवाईक तसेच शेजारच्यांचे जवाब घेतले. त्यावरून दूध तापविताना स्टोव्हचा भडका उडाला आणि त्यामध्ये ती भाजली, असे सांगितले. मात्र, मागील २४ तासांत पोलिसांनी आपली बाजू मांडली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी दोन वेळा नातेवाईकांचे जवाब घेतले. तसेच शुक्रवारी या तरुणीचाही जबाब घेण्यात आला. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी, सदर मुलगी दूध तापवत असताना स्टोव्हचा भडका उडला आणि त्या दुर्घटनेत ती जखमी झाल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा... हिंगणघाट जळीतकांड; पीडितेला कृत्रिम अन्ननलिकेतून अन्न, प्रकृती धोक्याबाहेर नाही