महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हासेगाव येथील सेवालायतील विद्यार्थी ट्रॅक्टरमधून महाविद्यालयात; संस्थापक झाले सारथी - latur marathi news

हासेगाव येथील 'हॅपी इंडियन व्हिलेज' च्या विद्यार्थ्यांसह संस्थापक अध्यक्ष रवी बापटले यांनी गेल्या 14 वर्षाच्या काळात एक ना अनेक संकटाचा सामना केला आहे. या 14 वर्षाच्या काळानंतर आता कुठे येथील मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. मात्र, त्यांच्या समस्या ह्या कायम आहेत. हासेगावपासून 22 किमी अंतरावर असलेल्या महाविद्यालयात या मुलांना ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागत आहे.

विद्यार्थी ट्रॅक्टरमधून महाविद्यालयात आले

By

Published : Jan 25, 2021, 3:20 PM IST

लातूर - लातूर शहरापासून 22 किमी अंतरावर औसा तालुक्यातील हासेगाव येथे 'हॅपी इंडियन व्हिलेज' ही संस्था एड्स बाधित मुलांसाठी काम करीत आहे. स्वावलंबनाबरोबरच आता या सेवालयातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात येत आहे. इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केल्यानंतर तब्बल 13 विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विभागात प्रवेश घेतला. वाहन नसल्याने महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी ट्रॅक्टरमधून आले होते. तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवी बापटले यांनी ट्रॅक्टर चालकाची भूमिका बजावली.

14 वर्षानंतर मुलांना मूलभूत सोई-सुविधांचा पुरवठा-

एका मुलापासून सुरू झालेल्या हॅपी इंडियन व्हिलेजमध्ये आता सध्या 84 मुलं-मुली आहेत. याच व्हिलेजमध्ये अनेक मूल ही लहानाची मोठी झाली. तर काहींनी या ठिकाणीच संसारही थाटले आहेत. 14 वर्षानंतर येथील मुलांना मूलभूत सोई-सुविधांचा पुरवठा होऊ लागला आहे. एवढेच नाही तर ही मुले आता शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या 13 विद्यार्थ्यांनी लातूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विभागात प्रवेश घेतला आहे.

विद्यार्थ्यांना नाईलाजाने ट्रॅक्टरमधून यावे लागले-

मात्र, या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यासाठी कोणत्याही वाहनाची सोय झालेली नाही. त्यामुळे आज महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष रवी बापटले यांनी ट्रॅक्टरमध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयात आणले होते. महाविद्यालयात येण्यासाठी विद्यार्थी दुचाकी- चारचाकी वाहनाचा वापर करतात पण सेवालयातील विद्यार्थ्यांना नाईलाजाने ट्रॅक्टरमधून यावे लागले आहे. रोज अशाच प्रकारे विद्यार्थ्यांचा प्रवास राहणार आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी समोर येऊन वाहनाची सोय करून देण्याची मागणी संस्थेचे अध्यक्ष शिवाय विद्यार्थीही करीत आहेत.

संस्थेचे अध्यक्षच झाले सारथी-

विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन शिक्षणाचा पहिला दिवस आणि जाण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने त्यांना ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागला. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी ट्रॅक्टरला टफ केला शिवाय दुरुस्तीही करून घेतली. हे सर्व करूनही चालक कोणी व्हायचे हा प्रश्न कायम होता. मात्र, संस्थेचे अध्यक्ष रवी बापटले यांनीच ट्रॅक्टरचे स्टेरिंग हाती घेतले. 23 किमीचा प्रवास करून महाविद्यालयाच्या वेळेत सर्वांना सोडण्यात आले आहे. पण रोज नियमित वेळी महाविद्यालयात स्वतंत्र वाहनाची येण्यासाठी आवश्यकता आहे.

हेही वाचा-'नागपूरचे 'निकरवाले' तमिळनाडूचं भविष्य ठरवू शकत नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details