लातूर - कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव पाहता सोमवारपासून नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका या ठिकाणच्या शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सोमवारी सकाळी शाळेच्या वेळात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी हजेरी लावली. मात्र, विद्यार्थ्यांना कोरोना बाबतची जनजागृती करून सुट्टी देण्यात आली तर शिक्षक हे शाळेतच होते.
कोरोनाच्या भीतीने विद्यार्थ्यांना सुट्टी, शिक्षकांची हजेरी कोरोना विषाणूच्या वाढत्या संभाव्य धोक्यामूळे लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी महानगरपालिका, नगरपरिषद व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी लागू केली आहे. याबाबतीत शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार तसे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
हेही वाचा -'ते' सातही रुग्ण निगेटिव्ह ; लातूरकरांचा जीव भांड्यात...!
सोमवारी अनेक शाळेत दहावीचे परीक्षा केंद्र असल्याने सकाळी शाळा भरल्यानंतर विद्यार्थ्यांना तशा सुचना देण्यात आल्या. कोरोना आजारासारखी काही लक्षणे दिसून आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला व उपचार घेण्याच्या सुचना शाळा स्तरावरुन देण्यात आल्या आहेत. यासोबतच जिल्ह्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह बंद ठेवण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. यासोबतच कोरोना टाळण्याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आल्या आहेत.
सध्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने शिक्षकांना केंद्रावर हजेरी लावावी लागणार आहे. मात्र, इतर दिवशी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात मात्र संभ्रम आहे.
हेही वाचा -पुण्यातून लातुरात आले कुटुंब... कोरोनाच्या धसक्याने ६ जणांची तपासणी