लातूर - अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी अहमदपूर शहरात येतात. मात्र, शाळेच्या वेळेत ज्यादा बस सोडण्याची मागणी विद्यार्थ्यांनी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. बसमध्ये नागिरीकांची गर्दी होताच विद्यर्थ्यांना थेट बसच्या टपावर बसून प्रवास करावा लागतोय.
विद्यार्थ्यांचा बसच्या टपावर बसून प्रवास; ज्यादा बसची मागणी फेटाळली
शाळेच्या वेळेत ज्यादा बस सोडण्याची मागणी विद्यार्थ्यांनी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. बसमध्ये नागिरीकांची गर्दी होताच विद्यर्थ्यांना थेट बसच्या टपावर बसून प्रवास करावा लागतोय.
शाळेच्या वेळेत ज्यादा बस सोडण्याची मागणी विद्यार्थ्यांनी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
२० किमी अंतरावर असणाऱ्या शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी धोका पत्कारून प्रवास करत आहेत. तांत्रिक अडचण असल्याने ज्यादा बस सोडता येत नसल्याचे कारण अहमदपूर आगार प्रमुखांनी दिले आहे.
शहरात खंडाळी, वाघोली, झरीगाव, बेलगाव, हाडोळी येथील विद्यार्थी येत आसतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळा-कॉलेजात जावे लागत आहे. वेळप्रसंगी खासगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.