महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 9, 2020, 4:24 PM IST

ETV Bharat / state

दागिने विकून उदरनिर्वाह करण्याची नामुष्की ; लातुरात एसटी कर्मचाऱ्यांचा 'आक्रोश'

मार्च महिन्यापासून अनेक एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. यासाठी आज सर्वत्र 'आक्रोश आंदोलन' करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने लातूर येथेही कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी घराजवळ एकत्र येत आंदोलन केले.

ST agitation in latur
दागिने विकून उदरनिर्वाह करण्याची नामुष्की ; लातुरात एसटी कर्मचाऱ्यांचा 'आक्रोश'

लातूर - मार्च महिन्यापासून अनेक एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. यासाठी आज सर्वत्र 'आक्रोश आंदोलन' करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत आंदोलन केले.

दागिने विकून उदरनिर्वाह करण्याची नामुष्की ; लातुरात एसटी कर्मचाऱ्यांचा 'आक्रोश'

कर्तव्य बजावूनही एस. टी. कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळत नाही. त्यामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवसातील 8 ते 10 तास काम करूनही पदरी पैसे पडत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आक्रोश आहे. एकीकडे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत आहेत. मात्र, परंतु सुरुवातीपासूनच एस.टी कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक मिळाल्याची भावना त्यांच्यात आहे. यासाठी आज राज्यभरात परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी आक्रोश आंदोलन छेडले. या पार्श्वभूमीवर सर्व कर्मचारी विभागीय कार्यालय परिसरातील जमले होते.

एस.टी. कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय भावनिक

नियमित कामावर असूनही एस.टी. कर्मचाऱ्यांची आजवर निराशाच झाली आहे. दिवाळी तोंडावर असताना घरात किराणाही नसल्याची खंत ते व्यक्त करत आहेत. यावेळी अनेक महिला कर्मचारी भावनिक झाल्या होत्या. वेळेत वेतन करण्याची मागणी यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details