महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लालपरीतून प्रवास पण निर्जंतुकीकरण करूनच; उदगीर आगारचा उपक्रम - st bus udagir

आतापर्यंत लातूर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे उदगीर तालुक्यात आढळून आले होते. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात या ठिकाणाहून बससेवा सुरू झाली नव्हती. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून या आगारातूनही बस सुरू झाल्या आहेत.

udagir st
लालपरीतून प्रवास पण निर्जंतुकीकरण करूनच

By

Published : Jun 9, 2020, 5:32 PM IST

लातूर - जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उदगीर आगारात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. बसस्थानक, एसटी तसेच बसमधील सीटदेखील सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण केले जात आहे. बससेवा सुरू होऊन 15 दिवस उलटले, तरी हा उपक्रम सुरू आहे.

लालपरीतून प्रवास पण निर्जंतुकीकरण करूनच

आतापर्यंत लातूर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे उदगीर तालुक्यात आढळून आले होते. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात या ठिकाणाहून बससेवा सुरू झाली नव्हती. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून या आगारातूनही बस सुरू झाल्या आहेत.

सध्या उदगीर तालुका कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे. असे असताना पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. स्थानकात प्रवासी दाखल होताच त्यांना सॅनिटायझर दिले जात आहे, तर अंतर ठेवून बसण्याची सोय केली आहे. शिवाय स्थानकात बस दाखल होताच तिचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. एका बसमध्ये ठरवून दिल्यानुसार 22 व्यक्तींनाच प्रवेश दिला जातो. आतापर्यंत उदगीर शहरात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. त्यामुळे पुन्हा धोका निर्माण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details