लातूर- मे महिन्यातील रखरखते ऊन... 24 तास मनात कोरोनाची धास्ती... असे असतानाही थेट नागरिकांमध्ये जाऊन सर्वे करण्याचं काम... हे काम जरी देशसेवेचं असलं, तरी मनावर उदार होऊन करावं लागते... एवढे करूनही महिन्याकाठी मिळते काय ? तर एक हजार रुपये मानधन.... ही व्यथा आहे जिल्ह्यातील 'आशा' स्वयंसेविकांची आमच्या हातून ही देशसेवा होत असली, तरी किमान मुलभूत गरजा भागतील एवढे तरी मानाचे धन मिळण्याची अपेक्षा आशा वर्कर करत आहेत.
कोरोनाच्या युद्धात केले 'दोन हात'; पण आता याच हातांना 'आशा' आहे वाढीव मानधनाची...! - आरोग्य विभाग लातूर
लातूर जिल्ह्यात परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी ठेवणे. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करणे. यासारख्या दिवसाकाठी 25 नोंदी करण्याचे उद्दिष्ट आशांना देण्यात आले आहे. मात्र महिन्याला 725 जणांची नोंद केल्यानंतर या महिलांना केवळ एक हजार रुपये मिळतात. ज्याप्रमाणे जीव धोक्यात घालून सेवा केली जाते, त्याप्रमाणे मानधनही मिळावे, अशी मागणी आशा स्वसंसेविकांकडून करण्यात येत आहे.
कोरोनाच्या संकटात योद्धा म्हणून आरोग्य अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या आशा वर्कर यांचाही समावेश होतो. परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी ठेवणे. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करणे. यासारख्या दिवसाकाठी 25 नोंदी करण्याचे उद्दिष्ट आशांना देण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात 1698 आशा वर्कर कार्यरत आहेत. गेल्या अडीच महिन्याच्या कालावधीत या महिलांनी तब्बल 84 हजार नागरिकांचा सर्वे केला आहे. यामध्ये बाहेर गावाहून आलेल्यांच्या नोंदी, संशयितांना क्वारंटाईन होण्यास सांगणे, सरकार दप्तरी याची नोंद करणे, ही कामे त्यांना करावी लागत आहेत. आतापर्यंत सर्वेचा तिसरा फेरा असून गावात नव्याने नागरिक दाखल होताच त्यांना गावी जावे लागते. मात्र, हे काम करत असताना स्थानिक पातळीवर आशा वर्कर यांना त्रासही सहन करावा लागत आहे.
महिन्याला 725 जणांची नोंद केल्यानंतर या महिलांना केवळ एक हजार रुपये मिळतात. ज्याप्रमाणे जीव धोक्यात घालून सेवा केली जाते, त्याप्रमाणे मानधनही मिळावे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने किट उपलब्ध व्हावेत, ही माफक अपेक्षा आशा वर्कर व्यक्त करत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून शहरात परजिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या हजारोत आहे. त्यामुळे 'आशा' स्वयंसेविकांचा ताण वाढला आहे. कुटुंबीयांपासून दूर राहून इतर कुटुंबीयांची काळजी त्यांना घ्यावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करावी, ही मागणी होत आहे.