लातूर - मराठवाड्यात लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीला विशेष महत्व आहे. कारण या बाजार समितीत सोयाबीनचे दर ठरविले जातात. बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. केवळ लातूर जिल्हाच नव्हे तर उस्मानाबाद, बीड तसेच कर्नाटकचे शेतकरीही याच बाजार समितीमध्ये दाखल होत आहे. मंगळवारी दिवसभर आवक सुरूच होती. बाजार समितीच्या समोर एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा होत्या. तसेच रात्रभर काटा होत पर्यंत अनेक शेतकरी बाजार समितीमध्ये तळ ठोकून होते. गेल्या आठवड्याभरापासून सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. सोयाबीनला प्रति क्विंटल 3900 ते 4000 हजाराचा दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी गर्दी करीत आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा काटा रात्रभर सुरू दिवसाकाठी 1 लाख क्किंटलहुन अधिकची आवक -
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी दिवसभरात 1 लाख 25 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. 4 हजारांपर्यंत दर असला तरी पावसामुळे सोयाबीन डागळले आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार आहे.
रात्री 1 वाजतापर्यंत चालला 'काटा' -
बाजार समिती बाहेर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच बाजार समितीमध्ये जागा मिळेल तिथे शेतकऱ्यांनी विसावा घेतल्याचे चित्र बाजार समितीत पाहायला मिळाले. सकाळी दाखल झालेल्या शेतकऱ्यांच्या मालाचा काटा रात्री वाजेपर्यंत देखील काटा झाला नाही. शिवाय, रात्रीच्या वेळी हमाल-मापाडी हे माल उतरून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.