लातूर - औसा तालुक्यातील लोदगाचे सुपुत्र गणपत सुरेश लांडगे हे सियाचीन येथे कर्तव्य बजावत असताना दहशतवाद्यांकडून झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले आहेत. बुधवारी सकाळी ही घटना घडली. यामुळे संपूर्ण लोदगा गावावर शोककळा पसरली आहे.
लोदगा गावचे जवान गणपत लांडगे सियाचीन येथे हुतात्मा - latur news
शहीद गणपत लांडगे यांचे पार्थिव गुरुवारी सियाचीन येथून पुणे येथे दाखल होणार आहे, तर पुण्यातून मोटारीने त्यांच्या मूळगावी आणले जाणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.
![लोदगा गावचे जवान गणपत लांडगे सियाचीन येथे हुतात्मा लोदगा गावचे जवान गणपत लांडगे सियाचीन येथे शहीद](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7085424-313-7085424-1588761724985.jpg)
गणपत लांडगे हे 2013 साली भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते महार रेजिमेंट बटालियनमध्ये कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना दहशतवाद्यांच्या चकमकीत त्यांना वीरमरण आल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. शहीद गणपत लांडगे यांचे पार्थिव गुरुवारी सियाचीन येथून पुणे येथे दाखल होणार आहे, तर पुण्यातून मोटारीने त्यांच्या मूळगावी आणले जाणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.
सुरेश त्यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांचा मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मूळगावीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासंबंधीची निश्चित वेळ अद्याप स्पष्ट झालेली नाही.