महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जात पडताळणीची प्रकरणे ८ दिवसात निकाली काढा - सामाजिक न्यायमंत्री खाडे

सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्याकडून लातूर विभागातील कामाचा आढावा घेण्यासाठी लातूर येथे विभागस्तरीय बैठक घेण्यात आली होती. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या आहेत.

सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे

By

Published : Jul 20, 2019, 8:51 PM IST

लातूर- सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्याकडून लातूर विभागातील अनेक प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी विभागस्तरीय बैठक घेण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजीक न्याय भवन लातूर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जात पडताळणीसह विभागातील विविध समस्यांचा आढावा घेतला.

जात पडताळणीची प्रकरणे ८ दिवसात निकाली काढावी -

लातूर विभागातील नांदेड, हिंगोली व उस्मानाबाद या जात पडताळणी समित्यांनी त्यांच्याकडील सर्व प्रलंबित प्रकरणे ८ दिवसात निकाली काढली पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रकरणांना अधिक प्राधान्य देऊन ती प्रकरणे रोजच्या रोज निकाली काढून त्याबाबतचा दैनंदिन अहवाल मुख्यालयाला पाठवावा. त्या प्रमाणेच प्रलंबित प्रकरणांसाठी वृत्तपत्रामध्ये जाहिरात देऊन विशेष मोहिम (कॅम्प) राबवावी, असे निर्देश खाडे यांनी यावेळी दिले.

जात पडताळणीची प्रकरणे आठ दिवसात निकाली - सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे

लातूरच्या या विभागस्तरीय बैठकीत मंत्री सुरेश खाडे यांच्याकडून अधिकाऱ्यांना काही सूचना वजा निर्देश देण्यात आले

  • प्रत्येक मागासवर्गीय शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात आणि वेळेत मिळाला पाहिजे. तसेच एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असून ही योजना अधिक प्राधान्याने राबवण्यात यावी.
  • लातूर येथे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या आय.टी. आय. च्या इमारतीमधील मुलींचे वसतिगृहाची इतर ठिकाणी सोय करावी.
  • लातूर विभागातील सर्व जिल्हयांनी दिव्यांग व्यक्तीचे पुढील आठ दिवसात सर्वेक्षण करुन प्रत्येक अपंग व्यक्तींच्या अपंगत्वाची नोंद स्वतंत्रपणे ठेवावी. ज्या दिव्यांग व्यक्तींचे अपंगत्वाचे प्रमाण 80 टक्के व त्यापेक्षा जास्त असले अशा दिव्यांगाना शासनाकडून मोफत घरकुल देण्याचे नियोजन करावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या परिसरात यावेळी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, जात पडताळणी समित्यांचे अध्यक्ष, जिल्हा समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details