लातूर- यावेळच्या लोकसभा निवडणुकीत लातूरकरांनी नोटा पर्यायासा पसंती दिली आहे. ६ उमेदवारांना 'नोटा' या पर्यायापेक्षा कमी मते मिळाली आहेत. सर्वाधिक मते भाजपला त्यानंतर काँग्रेसला त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि चौथा क्रमांक नोटाचा लागतो.
लातूर लोकसभा मतदारसंघात 'नोटा' चौथ्या क्रमांकावर - bjp
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत लातूरकरांनी नोटा पर्यायासा पसंती दिली आहे. ६ उमेदवारांना 'नोटा' या पर्यायापेक्षा कमी मते मिळाली आहेत.
लातूर लोकसभा निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्येच रंगल्याचे दिसून आहे. या निवडणुकीकरीता एकूण १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी भाजपचे सुधाकर शृंगारे यांना ६,६१ हजार ४९५ मते तर काँग्रेसचे मच्छिंद्र कामत यांना ३ लाख ७२ हजार ३८४ तर वंचित बहुजन आघाडीला १ लाख १२ हजार २५५ अशा प्रकारे सहा अंकी मते मिळाली. शिवाय नोटापेक्षा कमी मतावर उर्वरित ६ उमेदवारांना समाधान मानावे लागले.
सिद्धार्थकुमार सुर्यवंशी - ६ हजार ५४९, अरुण सोनटक्के ५ हजार २०८, दत्तू करंजीकर २ हजार १९४, रुपेश शंके ४ हजार ३५६, मधुकर कांबळे सर्वात कमी १ हजार ३२६, पपिता रणदिवे २ हजार ०९५, रमेश कांबळे २ हजार ११६ तर नोटा पर्यायाला ६ हजार ५६० जणांनी पसंती दिली आहे. म्हणजे ६ हजार ५६० मतदारांना या १० उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नव्हता. त्यामुळे प्रमुख पक्षाचे उमेदवार सोडता या उमेदवारांवर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १ हजार २९० मतदारांनी नोटा पर्याय निवडला आहे. तर अहमदपूर विधासभा मतदारसंघात नोटाचा सर्वात कमी वापर झाला आहे.