लातूर -कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, तसेच या महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात शेतीच्या कामासाठीची गर्दी पुन्हा होणार हे लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ८ ते १३ मे दरम्यान 6 दिवसांसाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.
सहा दिवस कडक निर्बंधासह लॉकडाऊन -
गेल्या काही दिवसांपासून शनिवार व रविवार असे दोन दिवस 'विकेंड लॉकडाऊन' लागू करण्यात आला आहे. या कालावधीत किराणा मालाची दुकाने, भाजी व फळ विक्रीसही बंदी करण्यात आलेली आहे. विकेंड लॉकडाऊनकरून तीन आठवडे उलटले तरी कोरोना बाधितांची संख्या फारशी कमी होत नसल्याने आता 6 दिवस कडक निर्बंधासह लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. 8 ते 13 मे या कालावधीत केवळ औषधे, दूध व पाणी याचीच विक्री करता येणार आहे. वर्तमानपत्र वितरणास परवानगी आहे. परंतू या व्यतिरिक्त अन्य कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.