महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आम्ही लातूरकर'चा मूकमोर्चा; निषेधासाठी एकवटल्या सर्व संघटना - आम्ही लातूरकर

हैदराबाद येथे मदतीचा बहाणा करून एका डॉक्टर तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. एवढेच नाही तर त्यानंतर ट्रकचालक व इतर तिघांनी तिचा खून केल्याची घटना २७ नोव्हेंबरला घडली होती. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेनंतर सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

amhi laturkar
'आम्ही लातूरकर'च्यावतीने मूकमोर्चा

By

Published : Dec 3, 2019, 4:43 PM IST

Updated : Dec 3, 2019, 10:50 PM IST

लातूर- हैदराबाद येथे डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या या घटनेचा निषेध संबंध देशभर होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून समाजातील विविध घटक समोर येऊन या घटनेचा निषेध करत आहेत. मंगळवारी 'आम्ही लातूरकर' या मथळ्याखाली सर्व नागरिक एकवटले होते. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क ते छत्रपती शिवाजी चौक दरम्यान नागरिकांनी मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग होता.

'आम्ही लातूरकर'चा मूकमोर्चा; निषेधासाठी एकवटल्या सर्व संघटना

हेही वाचा -भारत माझा देश आहे म्हणायला लाज वाटतेय, बलात्कारप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टर तरुणी संतप्त

हैदराबाद येथे मदतीचा बहाणा करून एका डॉक्टर तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. एवढेच नाही तर त्यानंतर ट्रकचालक व इतर तिघांनी तिचा खून केल्याची घटना २७ नोव्हेंबरला घडली होती. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेनंतर सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेतील आरोपींना कठोरात-कठोर शिक्षा मिळावी यासाठी समाजातील प्रत्येक घटक रस्त्यावर उतरत आहेत.

दोन दिवसांपूर्वीच लातूर शहरातील क्लासेस भागात विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढला होता. तर, आज आम्ही लातूरकर म्हणून सर्व नागरिक शहरात एकवटले होते.

Last Updated : Dec 3, 2019, 10:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details