लातूर -पंधरा दिवसातून एकदा होणारा पाणीपुरवठा आता एक ऑक्टोबरपासून बंद करण्यात येणार आहे. मांजरा धरणातील शिल्लक पाणी जपून वापरण्याच्या अनुशषंगाने आता जिल्हा प्रशासनाने नवे पाऊल उचलले आहे. दिवसाला प्रत्येक कुटुंबाला २०० लीटर पाणी दिले जाणार आहे, अशी माहिती होणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.
हेही वाचा - लातूरमध्ये पाणीटंचाईचा बळी; कोरड्या विहिरीत ट्रॅक्टर पडल्याने एकाचा मृत्यू
पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून पाणीदेखील मोजून वापरण्याची वेळ लातूरकरांवर आली आहे. पावसाळा सुरू होताच लातूरकरांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरवात झाली होती. ८ दिवसाचा पाणीपुरवठा १० दिवासांवर आणि आता १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, मांजरा धरणातील घटती पाणीपातळी यामुळे जिल्हा प्रशासनाने एक ना अनेक प्रयत्न केले. परंतू, पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊ नये शिवाय शिल्लक असलेल्या ४.५ दलघमी पाण्याचा जपून वापर होईल या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी हे पाऊल उचलले आहे.