लातूर - लातूरच्या व्यापाऱ्यांनी शहराच्या मुख्य बाजारपेठेत काळ्या फिती बांधून, हातात निषेधाचे फलक घेऊन शासनाच्या विरोधात मुक निदर्शने केली. "मत छिनो हमारा कारभार, हमारा भी है घरदार", "दुकान उघडायला परवानगी द्या अन्यथा दुकान ताब्यात घ्या"," होश मे आवो सरकार, नही तो डुब जाएगा व्यापार" अशा आशयाची फलक घेवून मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईत स्वत:च्या दुकानासमोर उभे राहून मुक निदर्शने केली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. विकेंड लॉकडाऊनची कडक आंमलबजावणी केली जात आहे. मागील 45-50 दिवसांपासून लातूरातील व्यापाऱ्यांची दुकाने बंद आहेत. छोट्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी काळ्या फिती बांधून, हातात फलक घेवून प्रशासनाच्या विरोधात निषेध व्यक्त केला.